मॅक्सज्ञानचा अर्थच मुळात मॅक्सिमम नॉलेज आणि ॲडवाइजरी म्हणजे समुपदेशन, सल्ला देणे. आम्ही दोघी म्हणजे जवळजवळ 35 वर्ष एकत्र विविध क्रीडा, कला, शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या, आपापल्या क्षेत्रात मस्त काम करून पैसे कमावून, यशाची चव चाखलेल्या, कर्तव्यदक्ष आई.
मी (वैशाली भिडे) लहानपणीच मिळालेल्या घरातील संस्कारांमुळे वयाच्या 13 व्या वर्षी क्रिकेट आणि 15 व्या वर्षात मुंबई क्रिकेट टीम चे नेतृत्व करण्याची जवाबदारी सोपविण्यात आली. एक-संघटित वृत्ती, संघाला सोबत घेऊन पुढे जाणे, जिद्दीने आपल्याला दिलेली जवाबदारी चोख पार पडणे, पैशाचे योग्य नियोजन करणे, ह्या आणि अश्या अनेक गोष्टींमुळे माझा आत्मा विश्वास तर वाढलाच पण माझ्या नोकरी, व्यवसायात त्याचा प्रत्येक वेळी उपयोग झाला. पुढे एमबीए पूर्ण करून 19 वर्षांची प्रदीर्घ कॉर्पोरेट वाटचाल करीत असताना अनेक स्वप्नं उराशी बाळगली.
तसेच रूपाली ठाकूरचा शाळेमध्ये अनेक खेळांमध्ये आघाडीवर, अशा गोष्टींमुळे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. मुळातच तिच्या अंगीं असलेली 'शिस्त' या गुणाचा खूप विकास झाला आणि बारावीनंतर क्रिकेट खेळायला सुरुवात करून, सिलेक्टर, व्यवस्थापक, खजिनदार अशी अनेक पदे भूषविली. चौदा वर्षे हाय कोर्ट मध्ये एडवोकेट म्हणून लीगल प्रॅक्टिस करत असतानाच, आठ वर्षे तिने मुंबई क्रिकेट असोसिएशनसाठी पहिली अधिकृत लेडी स्कोरर म्हणून काम केले. स्थानिक, राज्य व राष्ट्रीय पातळीवरच्या अनेक मॅचेस साठी तिने स्कोअरिंग केले,
योग्य मार्गदर्शन आणि योग्य सल्ला वेळेत मिळाल्यामुळे खूप चांगल्या प्रकारे आपण आपले यशाचे शिखर लवकर गाठू शकतो.
युवकांमध्ये खिलाडूवृत्तीचा परिपोष करणे हे मॅक्सज्ञानचे उद्दिष्ट आहे.
To Develop Sportsmanship Mindset amongst youth and create Healthy Wealthy Globe आणि तसेच आमचे व्हिजन आहे. To create awareness amongst One million Families and provide clarity on career opportunities in Sports and create Olympic champions for India
प्रत्येक घरात एक खेळाडू जन्माला आला पाहिजे. का? म्हणूनच ह्याची सुरुवात वय वर्ष तीन पासूनच होणे गरजेचे आहे. हेच मॅक्सज्ञान मध्ये वय वर्ष 3 पासूनच्या मुलांसाठी आणि पालकांसाठी विविध खेळांचे महत्त्व सोपे करून शिकविले जाते. साइन्टिफिक अससेसमेंट चाचणीच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या खेळाशी जोडतो,अभ्यासा विषयीची गोडी निर्माण करतो, योग्य विषय निवडी बाबत मार्गदर्शन करतो मुलं आणि पालकांशी स्वतंत्र संवाद साधतो.
उदा. आमच्या समुपदेशना च्या वेळी इयत्ता दहावीचा मुलगा. संगीताची आवड, सोबतच क्रिकेट आणि चेस खेळायची पण आवड. मुलाची साइन्टिफिक अससेसमेंट चाचणी केल्या नंतर, ह्या मुलाची संपूर्ण आवड हि स्पोर्ट्स कडे होती. त्याच्या कोर कॉम्पेटेन्सी प्रमाणे सांघिक खेळ त्याच्यासाठी योग्य आहेत हे लक्षात आले आणि मग त्याला दहावी पासून ते मास्टर्स पदवी पर्यंत आणि मग पुढे अर्थार्जनाच्या दृष्टीने उलब्ध होणाऱ्या संधींबद्दल मार्गदर्शन केले आणि कोणत्या इन्स्टिटयूट मध्ये आणि कोणता विषय घेऊन ऍडमिशन घ्यायची हेही सांगितले.
कोणतेही करिअर निवडताना ते करिअर आपल्याला पुढच्या १५ - २० वर्षासाठी अर्थार्जन प्राप्त करून देऊ शकते की नाही ही पालकांची चिंता बहुतौशी प्रमाणात आम्ही दूर करतो.
अशीच एक आठवीतली मुलगी डॉक्टरच होणार म्हणून ठाम मांडून बसली होती. साइन्टिफिक अससेसमेंट नंतर लक्षात आले की ही मुलगी अतिशय सृजनशील आहे. हिला काव्य, साहित्य, इतिहास, परफॉर्मिंग आर्ट्स ह्या विषयांची जबरदस्त आवड आहे. ओरिएंटेशनच्या वेळी असे लक्षात आले की ही मुलगी आपल्या आजोबांसोबत त्यांच्या उपचारासाठी ऑर्थोपेडिक सर्जन कडे जात असत. त्या वेळेस त्या क्लिनिक मधील वातावरण, तेथील रचनात्मक, कलात्मक बांधकाम हे तिला भावले होते, तसेच डॉक्टर म्हंटले की भरपूर फीस मिळते आणि म्हणून विज्ञान, गणित ह्या विषयांची आवड नसतानाही तिला डॉक्टर व्हायचे होते. आता अश्या परिस्थिती मध्ये एक पालक म्हणून आपल्याला जागरूक राहणे किती महत्वाचे आहे हे ह्यातून लक्षात येते आणि योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे असते.
पालकांचे समुपदेशन खूप महत्त्वाचे असते. घरातील संवाद अत्यंत महत्त्वाचा असतो. पालक आणि मुलांमधील नाते संबंध, सुसंवाद असे आणि अनेक मुद्दे हल्ली दुर्लक्षित राहतात आणि म्हणूनच ह्या सर्व नाजूक गोष्टींना हाताळण्यासाठी आम्ही नाविन्यपूर्ण स्पोर्ट्स नर्सरीची संकल्पना यशस्वीपणे राबवत आहोत.
मुलं सतत आजारी पडणे, सर्दी, खोकला, ताप वारंवार येणे, पावसाळा, हिवाळा ह्या ऋतूंचा मुलांना त्रास होणे, मुलांची चीड चीड होणे, भावंडांमधील सतत च्या कुरगुड्या आणि सतत चा औषधंवरचा खर्च टाळायचा आहे का? तर, मॅक्सज्ञान स्पोर्ट्स नर्सरी शिवाय पर्याय नाही.
भावी पिढीला आभासी मैदानावरून प्रत्यक्ष मैदानावर आणणे आवश्यक आहे आणि त्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत.
आमच्यासाठी खेळाडू हा शेवटपर्यंत खेळाडू असतो.
उदा. असाच एक विद्यार्थी फ़ुटबाँल मध्ये झिल्ला स्थरावर प्रतिनिधित्व केले. डेटा अनालिटिक्स मध्ये पदवीधर. त्याच्या साइन्टिफिक अससेसमेंट चाचणी नंतर त्याला आम्ही त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी Loughborough University, UK मध्ये स्पोर्ट्स डेटा अनालिटिक्स मध्ये स्पेशलायझेशन करायला संपूर्ण मार्गदर्शन केले. ज्या अर्थी तो त्याच्या Passion ला Profession मध्ये परिवर्तीत करू शकेल.